Translate

बोधकथा (2021) धाडसाने माणसाचा विजय होतो
बोधकथा


दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. शेतकयांनी आपापले औतं सोडून जेवणासाठी झाडाचा आसरा घेतला होता. महादूही आपल्या शेतात नांगरणी करीत होता. बरोबरचे शेतकरी जेवणासाठी केव्हाच औते सोडून गेल्याचे पाडून महादू त्याच्यामुलाला म्हणाला, "एकनाथा चल बुवा, आपणही भाकरी खाऊनघेऊ या. थोडासा विसावा घेऊ आणि मग पुन्हा कामाला सुरवात करूं". आपल्या बापाची आज्ञा ऐकून एकनाथ म्हणाला, “हो बला, आपण जाऊ या जेवण करण्यासाठी."


एकनाथ महादूचा तसा एकुलता एक मुलगा. एकनाथ गावांत खुपच हुशार व घाडसी तसेच प्रामाणिकपणानं वागताना दिसे. त्याचे कधी कुणाशी भांडण झाल्याचे महादूकडे उदाहरण नसायचे. भाकरी खाऊन मंडळी ढेकर देत पेंग लागली आणि थोड्याच वेळात महादूही जमिनीवर झाडाखालीच आडवा झाला. एकनाथ मात्र झाडाखाली त्याच्याजवळ असलेली बासरी वाजविण्यात दंग होऊन गेला. एकनाथ बासरी खूपच चांगली वाजवित असे. 


अभ्यासाबरोबरच त्याने ही कला शिकून घेतली होती. एकनाथच्या बासरीच्या स्वरांनी आसमंत दरवळून गेल्यासारखा वाटत होता. त्याच्या बासरीच्या स्वरांना पक्षीही आपल्या सुमधुर स्वरांनी साथ देत होते. पण अचानक कसल्यातरी बुडूक..........ऽ सारख्या आवाजाने एकनाथ भानावर आला. एकनाथला तो आवाज त्याच्यापासून दहा-वीस पावलांवर असलेल्या विहीरीच्या दिशेने आला होता. 


Also Read: Marathi SMS on life

एकनाथ हातातील बासरी टाकून वेगाने विहिरीत कुणीतरी पडले हो' असे मोठ्याने ओरडत त्या विहिरीकडे धावला. विहिरीजवळ येताच एकनाथने विहिरीत डोकावून पाहिले. कुणीतरी मुलगी पाण्यात गटांगळ्या खात असलेली त्याने पाहिली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता क्षणातच त्याने विहिरीत उडी घेतली. 


विहिरीत उडी मारून एकनाथने पोहत पोहत त्या मुलीचे केस पकडले आणि नंतर तिला आपल्याकडेच ओढून विहिरीच्या एका कोपऱ्याच्या दिशेने आणले तोपर्यंत झोपलेली सर्व मंडळी एकनाथाच्या ओरडण्याने जागी झाली होती.


तुकारामही जागा झाला आणि तो विलक्षण दचकलाच. कारण त्याची मुलगी त्याच्याजवळ नव्हती, तुकाराम विचार करत होता. मुलगी गेली तरी कुठे? तुकाराम त्याच्या मुलीला इकडे तिकडे शोधत होता आणि इकडे महादूसह सर्व शेतकारी विहिरीच्या दिशेने पळत होत पण तुकारामाच्या मात्र लक्षात काहीच येईना.


Also Read: form filling Dbatu 

परंतु नाईलाजान तोदेखील त्यांच्या मागोमाग विहिरीकडे घावला. सर्वजण विहिरीजवळ येऊन पोहोचले. एकनाथने तुकारामाच्या मुलीला घट्ट पकडून ठेवले होते आणिती मुलगी मोठमोठ्याने रडत होती. मग महादू व इतर लोकांनी एक रस्सी खाली टाकली आणि त्या दोघांना एकेक करून वर काढले. एकनाथने झालेला सर्व प्रकार त्या सर्वांना सांगितला. सर्वांनी एकनाथला शाबासकी देऊन तोंडभरून त्याचे कौतुक केले. कृषी योजना माहिती करिता येथे click करा 


तुकाराम म्हणाला, एकनाथ, तू माझ्या मुलीचा जीव वाचविला; खरोखरच मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. हां...हां म्हणता ही बातमी गावात पोचली आणि मग काय, एकनाथची गावातून भव्य मिरवणूक काढून ग्राम पंचायतीने त्याचा सत्कार केला.

मुलानो, तुम्हीही दुसऱ्यावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी झटले पाहिजे. त्याचा जीव वाचविला पाहिजे त्यातच तुमच्या जीवनाचं सार्थक होईल हे विसरू नका; कारण उद्या तुमच्यावरही असा प्रसंग आला तर तुमच्यासाठीही एकनाथसारखी घाडशी मुले घावल्यावाचून राहणार नाही बरे. 


बोध- धाडसाने माणसाचा विजय होतो, धाडसानेच माणूस पुढे जातो.


1 टिप्पण्या

  1. खूपच छान गोष्ट आहे. धाडस केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. ही सुद्धा वेबसाइट विजिट करून बघा कृषि योजना 

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने