Translate

काळ म्हणजे काय आणि काळाचे प्रकार कोणकोणते आहेत, याविषयीची माहिती या पोस्ट मधे पाहूया. मराठी व्याकरणमधे काळ ओळखणे हे खूप महत्त्वाचे भाग आहे. काळामुळेच अपना सांगू शकतो की कोणती क्रिया घडत आहे, घडणार आहे किंवा घडली आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर काळ येणे खूप महत्त्वाचे आहे.

मराठी व्याकरण; काळ म्हणजे काय? काळाचे प्रकार कोणकोणते आहेत? उदाहरण Tense In Marathi
मराठी व्याकरण; काळ व काळाचे प्रकार

काळ म्हणजे काय? (Kal Mhanje kay?)

वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसा प्रतिक्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात आणि प्रत्येक काळाचे पुन्हा चार उपप्रकार पडतात.

काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात 

वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ

काळाचे चार उपप्रकार

साधा
पूर्ण
अपूर्ण
रीती

साधा वर्तमानकाळ, पूर्ण वर्तमानकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ आणि रीती वर्तमानकाळ. भूतकाळ पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ असे चार प्रकार पडतात. भविष्यकाळा साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ अशा पद्धतीने प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात.


हे पण वाचा मराठी व्याकरण अलंकार आणि अलंकाराचे प्रकार


या तीन प्रकाराच्या व्याख्या आपण पाहूया प्रथम वर्तमान काळ 

वर्तमानकाळ म्हणजे काय?

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते असते जेव्हा समजते तेव्हा वर्तमानकाळ असतो.
उदाहरणार्थ: मी पत्र लिहितो.
या वाक्यांमध्ये लिहिण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे ती क्रिया आता घडते आहे या मुळे हा वर्तमानकाळ आहे.

भूतकाळ म्हणजे काय?

या पदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा भूतकाळ असतो. 
उदाहरणार्थ: मी पत्र लिहिले होते किंवा लिहीत होतो.
क्रियापदाच्या रूपावरून पूर्वी घडलेली घटना दाखवत असेल तर भूतकाळ होतो. या वाक्य वरुण असे समजते की लिहिण्याची क्रिया पूर्वी झाली आहे.

भविष्यकाळ म्हणजे काय?

एखादी क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो.
उदाहरणार्थ: मी पत्र लिहिले. 
या वाक्यावरून असे समजते की लिहिण्याची क्रिया ही पुढे कधी तर होणार आहे. यालाच आपण अंदाज असे म्हणु शकतो. भूतकाळ मधे करेल, बनवले असे क्रियापद वापरेल जातात. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने