Translate

मित्रांनो जर तुम्ही अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये फक्त शंभर रुपयेचे बिटकॉइन विकत घेतले असते. तर त्याचे आज एक ते दोन करोड रुपये किंमत झाली असती, विश्वास बसत नाही ना पण असं झालेला आहे. खूपच विवादित किंवा नेहमीच चर्चेत असलेली बिटकॉइन याविषयीची माहिती आपण आज वाचणार आहोत. 2010 मध्ये एका बिटकॉइनची किंमत पाच रुपये होती आणि आज जानेवारी 2021 मध्ये एका बिटकॉइनची किंमत तीस लाख झाली.

बिटकॉइन म्हणजे काय आणि बिटकॉइनचा इतिहास मराठी मधे (Bitcoin Information In Marathi)

बिटकॉइन म्हणजे काय?

बिटकॉइन म्हणजे क्रिप्टो करेंसी (आभासी) डिजिटल करेंसी म्हटले जाते. बिटकॉइन ला आपण हातामध्ये किंवा घरामध्ये साठवू शकत नाही. याचा वापर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा कम्प्युटरमध्ये केला जातो. ऑनलाईन स्टोअर होते.


बिटकॉइनचा अविष्कार कोणी केला?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांचा अविष्कार नेमका कोणी केला हे अजूनही कोणाला माहित नाही. परंतु 2008 इंटरनेटवर bitcoin.org हे डोमेन रजिस्टर करण्यात आले होते आणि बिटकॉइन बद्दल एक डॉक्युमेंट प्रसारित करण्यात आले होते. जे होते संतोषी नाकामोटो यांच्या नावाने. यामध्ये त्यांनी लिहिले होते की बिटकॉइन हे  इलेक्ट्रॉनिक रोख आहे. जे सर्व आर्थिक व्यवहारासाठी वापरू शकता आणि तेही कोणत्याही सेंट्रल केंद्रीय अधिकार शिवाय. यामुळे बिटकॉइन श्रेय सतोशी नकमोटो यांच्या नावे मांडण्यात आले आहे. परंतु अजूनही सतोशी नकमोटो यांची ओळख कोणालाच माहिती नाही.


मित्रांनो डिसेंट्रलाइज(विकेंद्रीकृत) चलन आहे. म्हणजेच या चलन वर कोणाचे नियंत्रण नाही. उदाहरणार्थ जसे आपल्या आर्थिक व्यवहारावर बँकेचा नियंत्रण राहाते आणि बँकेवरती रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे कंट्रोल राहाते परंतु  बिटकॉइनवर कोणत्याही कंट्रोल नाही. बिटकॉइन हे ऑनलाईन ट्रान्सफर होणारी करन्सी आहे. म्हणजेच या व्यवहारात फक्त सेंटर आणि रिसिवर असतो. सेंटर आणि रिसिवर कडे स्वतःचा युनिक ऍड्रेस असतो त्या द्वारे त्यांचा व्यवहार केला जातो. बिटकॉइन ॲक्सेस करण्यासाठी युजर कडे स्वतःची प्रायव्हेट की सुद्धा असते. 


ट्रांजेक्शन व्हेरिफाय करण्याचे काम मायनर करत असतं. यासाठी मायनरस हाय पावर चे कम्प्युटर वापरून मॅथेमॅटिकल अल्गोरिदम ऑपरेशन सोडतात. हे सर्व ऑटोमॅटिक प्रोग्रॅमद्वारे काही सेकंदातच केले जाते. जेव्हा मायनिंग प्रक्रिया यशस्वी होते तेव्हा मायनरना रिवॉर्ड म्हणून बिटकॉइन दिला जातो.


हे सर्व रेकॉर्ड ऑनलाइन ब्लॉक मध्ये साठवले जाते. एकदा ब्लॉक फुल झाले की नवीन ब्लॉकसोडून रेकॉर्ड ठेवले जाते या प्रोसेस ला ब्लॉकचेन म्हटले जाते. जगभरात हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिप्टो करेंसी आहेत. जसे की न्यू, Ripple, Ethereum etc.


बिटकॉइनला कोणत्या देशांत मान्यता?

बऱ्याच देशांनी क्रिप्टो करेंसी रोजच्या व्यवहारात वापरण्यासाठी मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स हे मोठे देश सुद्धा आहेत. भारताने सुद्धा मागच्या वर्षी 2020 मध्ये क्रिप्टो करेंसी व्यवहाराला मान्यता दिली आहे.


जगातील सर्वात पहिला बिटकॉइनच व्यवहार 2010 साली झाला होता. या व्यवहारमधे दहा हजार रुपये बिटकॉइन देऊन त्याचा पिझ्झा विकत घेण्यात आला होता. किमत चढ उतार पाहून गुंतूनकादार शेअर मार्केटमधील स्टॉक प्रमाणे बिटकॉइन विकत घेतात आणि जसे किमतीत वाढ  योग्य की योग्य किमतीत विकून टाकतात. 


मित्रांनो जर आपल्या बँकेव्यवहारचा यूपीआय पीन व पासवर्ड हरवला असेल तर तो आपण बँकेत जाऊन रिकव्हर करतो.परंतु बिटकॉइनच्या बाबतीत असे करता येत नाही. कारण या करेंसी वर कोणाचाही कंट्रोल नसल्यामुळे जर एकदाचे प्रायव्हेट पिन हरवली तर आपण रिकव्हर करू शकत नाही आणि आपण आपलेच बिटवीन ऍक्सेस करू शकणार नाहीत. असे एकदा जर्मनी मधे झाले होते. एका जर्मन प्रोग्रामर थॉमस यांच्याकडे सात हजार पेक्षा जास्त बिटकॉइन होते परंतु त्यांनी प्रायव्हेट की हरवल्यामुळे ते कधीच स्वतःचे अकाऊंट पुन्हा open करू शकले नाहीत.


मित्रांनो आज यांची किंमत करोडोमधे झाली असती. बिटकॉइनवर कोणाचे कंट्रोल नसल्यामुळे हे ट्रेक करणे खूपच अवघड आहे. आणि यामुळेच व्यवहारासाठी वापरले जात आहे आणि आत्तापर्यंत 25% बिटकॉइन इंटरनेटवर हरवले आहेत. मित्रांनो बिटकॉइंसचा व्यवहार करताना आधी सर्व माहिती मिळवा असे तज्ञांकडून सांगितले जाते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने