कधी वाटलं होतं का ?
असेही दिवस येतील?
माणस एकमेकांना भेटायला तरसतील,,,,,,
कधी वाटलं होतं का ?
माणसांच्या गर्दीतुन
माणूसच गायब होईल ?
सगळे ऐश्वर्य असुनही
माणूस एकटा होईल ?
कधी वाटल होत का
असही होईल ?
गावांमध्ये व सोसायट्यांमधून एकमेकांशी
टाळ्या देत मारलेले संवाद
नाहीसे होतील, ,,,,,, ?
आपलीच जिवाभावाचे लोक आपल्याला लांबूनच राम राम ठोकून निघून जातील.
कधी वाटलं होतं का ?
अंगणात खेळणारी ,,,,,,,
हसणारी मुल,,,,
दंगा करणारी मुलं ,,,,,,
आपापल्या घरात बंदिस्त
होतील, ,,,
कधी वाटलं होतं का ?
एकेकाळी गर्दीने बहरलेले रस्ते
असे अचानक ओस पङतील .
हाॅटेल मधुन येणारे सुवास
हसणारे खिदळनारे आवाज ,,,
लुप्त होतील ?
कधी वाटलं होतं का ?
युगानुयुगे चालत आलेली परंपरा
सुध्दा आज बंद झाली ..
देव देवतांना सुद्धा बंदिस्त राहावे
लागले .
कधी वाटलं होतं का ?
भले विज्ञान. तंत्रज्ञान आज
कितीही पुढे गेलं ,,,
चंद्रावर जरी जाऊन पोचलं,,,,
तरी सुद्धा एवढ्या क्षुद्र अशा ,,,
विषाणू पुढे. निसर्गापुढे ,,,
माणूस एकदिवस असा नतमस्तक होईल ?
कधी वाटलं होतं का ?
Post a Comment