Translate
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०२-०५-२०२०/शनिवार*

1.राज्यात काल १ हजार ८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत,त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६  झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या 35 हजार 365 पेक्षा जास्त झाली आहे, तर संपूर्ण जगात या रोगाचे आता 34 लाखा पेक्षा जास्त रुग्ण तयार झाले आहेत.

2. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून नव्याने झोन्सची विभागणी केली त्यानुसार महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये, तर 16 जिल्हे ऑरेंज आणि ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहे ,राज्यातील कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत तसेच सध्या २० टक्के रुग्ण बरे होत आहेत - आरोग्यमंत्री राजेश टोपे

 3. WhatsApp Update - आता WhatsApp एकसोबत ८ लोकांना ग्रुप्स व्हिडिओ कॉल करता येईल , सध्या बीटा व्हर्जनमध्ये ही सुविधा सुरु झाली असून लवकरच इतर युजर्सला देखील ही सुविधा मिळणार आहे.

4  काल विनाअनुदान गॅस सिलिंडर (१४.२ किलोचे ) १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत .

5. कोरोनाच्या राज्यात सध्या ४५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत त्यात दररोज ७ हजारांहून अधिक लोकांची चाचण्यांची होऊ शकते - आरोग्यमंत्री राजेश टोपे

6. कोरोनामुळे जगभरात जवळपास २ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू झालं आहे . यात सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेत झाले आहेत एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे 65 हजार पेक्षा जास्त लोकांनाच मृत्यू झाला आहे .

7. उत्तर कोरियाच्या सरकारी न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार माझी उत्तर कोरियाचे तानशाह किम जोंग उन अजून जिवंत आहेत, उत्तर कोरियाच्या 1 मे रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ते हजर होते, त्यामुळे सध्या व्हायरल होणाऱ्या सर्व न्यूज खोट्या आहेत .

8. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून राज्यातील जनतेला १०० टक्के मोफत आरोग्य उपचार मिळणार आहे - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने