जे रामायण बघत आहेत त्यांनी बघितलं असेल की रावण जेव्हा सिंहासनावर बसलेला दाखवत असत तेव्हा त्याच्या पायाखाली एक माणूस हा असा पडलेला असायचा. हा माणूस कोण होता ? रावणाच्या पायाखाली सिंहासनाच्या समोर या अशा अवस्थेत शनिदेव असायचे.
रावणाने फक्त देवांना त्रास दिला नाही, त्याने नवग्रहांनाही आपल्या मुठीत ठेवलं होतं. त्यांना डांबून तो त्यांना लंकेला घेऊन गेला होता.
रावण ज्योतिषविद्येत पारंगत होता. जेव्हा मेघनादचा जन्म होणार होता तेव्हा रावणाने सगळ्या ग्रहांना अशा घरांमध्ये बसवलं की होणारा मुलगा अजय, अमर होईल. पण शनिदेवांनी एक युक्ती केली, बरोबर मेघनादच्या जन्माच्या आधी एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश केला. यामुळे झालं असं की, मेघनाद अजय आणि दीर्घायुषी होऊ शकला नाही. हे बघून रावण प्रचंड चिडला आणि त्याने शनीच्या पायावर गदा प्रहार केला. एवढं करूनही रावणाचा राग शांत झाला नाही. शनीचा अपमान करण्यासाठी आणि शनिदेवांच्या वक्रदृष्टीपासून लंकेला वाचविण्यासाठी रावणाने शनिदेवांचं तोंड खाली जमिनीकडे करून त्यांना सिंहासनासमोर टाकून दिलं. सिंहासनावर बसल्यावर पाय ठेवण्यासाठी रावण पालथ्या शनिदेवांचा उपयोग करत असे. सिंहासनावरून उठताना, बसताना रावण शनिदेवांच्या अंगावर पाय ठेवून मुद्दाम त्यांना जोरात दाबत असे.
पुढे बर्याच वर्षांनी हनुमान जेव्हा सीतामाईच्या शोधार्थ लंकेत आला तेव्हा त्याने या नऊ ग्रहांना मुक्त केलं. त्यावेळी लंकेतून बाहेर पडताना शनिदेवांनी आपली वक्रदृष्टी लंकेवर टाकली आणि त्याचा परिणाम असा झाला की रावणाची सोन्याची लंका जळून खाक झाली.
हनुमानाने शनिदेवांना मुक्त केलं, यामुळे प्रसन्न झालेल्या शनिदेवांनी हनुमानाच्या भक्तांनाही आयुष्यातील त्रासापासून दूर ठेवण्याचा आशिर्वाद दिला.
RAVAN |

Post a Comment