Translate

क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार 

(Kriyapad v Kriyapadche Prakar)

कोणत्याही वाक्यामध्ये ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिले म्हणजे कर्ता, दुसऱ्या म्हणजे कर्म आणि तिसरा म्हणजे क्रियापद, त्यालाच इंग्लिश मध्ये (Subject, Object, Verb) म्हणतात. असे ही नाही की जर वाक्यामध्ये या तीन गोष्टी नसतील तर वाक्य पूर्ण होत नाही. अशी उदाहरणे आपण या पुढच्या पोस्टमध्ये पाहूया. सध्या आपण क्रियापद म्हणजे काय? आणि क्रियापदाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यांची उदाहरणे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

मराठी व्याकरण: क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सहाय्यक, प्रयोजक, शक्य

क्रियापद (Verb)

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला ‘क्रियापद' असे म्हणतात.

1) मी जेवण करतो. 2) मी गावाकडे जाते.

वरील वाक्यामधे "करतो, जाते" हे शब्द आपल्याला क्रिया दाखवण्याचे काम करत आहे. म्हणजेच एखादी गोष्ट करण्याची क्रिया, जाण्याची क्रिया आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे. अशा शब्दांना क्रियापद (Kriyapad) असे म्हणतात.

वाक्यातील कर्ता आणि कर्म कसा शोधायचा?

जर वाक्यातील तुम्हाला कर्ता आणि कर्म हा शोधायचा असेल, तर तुम्हाला क्रियापदाला कोण? आणि काय? हे दोन प्रश्न विचारावे लागतील तेव्हा तुम्हाला वाक्यातील कर्ता आणि कर्म भेटतील. 

उदाहरणार्थ पाहूया, मी नेहमी पुस्तक वाचतो

या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया होत आहे म्हणजे वाचतोय हा आपला क्रियापद आहे. जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारू की कोण? तेव्हा उत्तर येतो मी म्हणजेच या वाक्यातील कर्ता (Subject) झाला मी आणि काय? हे प्रश्न विचारतात आपल्याला उत्तर भेटते पुस्तक म्हणजेच कर्म (object) झाला पुस्तक. 

नेहमी कोण? आणि काय? हे दोनच प्रश्नावरून आपल्याला कर्ता आणि कर्म हा ठरवता येत नाही तर काही इतरही प्रश्न विचारा लागतात, जसे की उदाहरणार्थ मला आंबा आवडतो

जर तुम्ही आता इथे क्रियापदाला विचारले कोण? तर तुम्हाला बरोबर उत्तर भेटणार नाही. या जागी तुम्हाला विचार लागेल कोणाला? आणि काय? तरच तुम्हाला कर्ता(Karta) आणि कर्म (Karm) भेटतो. 


कधी कधी काय होते की कोण आणि काय आणि कोणाला हे प्रश्न विचारून सुद्धा कर्ता आणि कर्म भेटत नाही तेव्हा अजून एक उपाय आहे. ज्यावरून तुम्ही शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला क्रियापदातील मूळ शब्द आणि प्रत्यय वेगळं करावे लागतील आणि मूळ शब्दाला "-णारा" हा प्रत्यय लावा लागेल आणि त्यानंतर प्रश्न विचारा लागेल कोण? तेव्हा तुम्हाला वाक्यातील कर्ता (Karta) आणि कर्म (Karm) भेटेल. 

क्रियापदाचे प्रकार 

आतापर्यंत आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद याविषयी जाणून घेतला आहे. आता आपल्याला क्रियापदाचे प्रकार(Kriyapada che Prakar) जाणून घ्यायचे आहे ते पुढील प्रमाणे. क्रियापदाचे विविध प्रकार आहेत, 1) सकर्मक क्रियापद, 2) अकर्मक क्रियापद, 3) संयुक्त क्रियापद, 4) सहाय्यक क्रियापद, 5) प्रयोजक क्रियापद, 6) शक्य क्रियापद. 

सकर्मक क्रियापद 

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते, त्याला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदा: राजू जेवण करतो

जर या वाक्यामध्ये जेवण हा कर्म नसता तर राजू आपल्याला नेमकं काय करतोय, हे समजले नसते तर या वाक्यामध्ये कर्माअसणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. अशा प्रकारच्या वाक्यांना सकर्मक क्रियापद (Sakarmak Kriyapad) असे म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण.
 • रमेश पत्र लिहितो
 • मी गाडी चालवतो
 • मला चित्रपट बघायचा
 • आम्ही घर घेतले

अकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, त्यास 'अकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.

अकर्मक क्रियापदाचे उदाहरण. 
 • गणेश पडला. 
 • विद्यार्थी प्रमाणिक आहे.
 • मी गाडीवर बसतो.
तुम्ही वरील वाक्य वाचू शकतात त्यामध्ये कर्माची काहीही आवश्यकता नाहीये वाक्य पूर्ण करण्यासाठी. अशा प्रकारच्या वाक्यांना अकर्मक क्रियापदे (Akarmak Kriyapad) असे म्हणतात. 


संयुक्त क्रियापद

जेव्हा एखाद्या क्रियाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रुपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. या प्रकारे दोहोंच्या एकत्रपणामुळे जे क्रियापद तयार होतो. त्यास संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

संयुक्त क्रियापदाचे उदाहरण

 • त्याने कपडे कपाटात ठेवून दिले.
 • मैदानावर मुले-मुली खेळू लागली.

मुख्य क्रिया दर्शवणारे रुप + सहाय्यक क्रियापद = संयुक्त क्रियापद ( Sanyukt Kriyapad) 


सहाय्यक क्रियापद :

मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून दुसरे क्रियापद येते, त्याला 'साहाय्यक क्रियापद' असे म्हणतात. 

साहाय्यक क्रियापदाचे उदाहरण (Sahayak Kriyapad) 

 • त्याने कपडे कपाटात ठेवून दिले.
 • मैदानावर मुले-मुली खेळू लागली.


हे पण वाचा:  मराठी व्याकरण; काळ म्हणजे काय? काळाचे प्रकार कोणकोणते आहेत? उदाहरण 

 

प्रयोजक क्रियापद 

जेव्हा एखादा व्यक्ती एखादी क्रिया दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेत असेल, तेव्हा ती क्रिया दर्शवणारे क्रियापद म्हणजेच 'प्रयोजक क्रियापद' होय.

प्रयोजक क्रियापदाचे उदाहरण
 • बाबा मुलाला जेवण बनवाय लावतात.
 • मी मित्रा पुस्तक वाचून घेतो.
तुम्ही वरील वाक्य वाचू शकतात हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणजेच मुलाकडून जेवण बनवून घेता आहे. अशा प्रकारच्या क्रियापदांना प्रयोजक क्रियापद (Prayojak Kriyapade) असे म्हणतात


शक्य क्रियापद

जेव्हा एखाद्या क्रियापदावरुन शक्यता अथवा सामर्थ्य याचा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाला 'शक्य क्रियापद' असे म्हणतात. 

शक्य क्रियापदाचे उदाहरण 
 • आजारानंतर आता मला खेळवते.
 • या मुलाला एक गाय चालवते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने