अलंकार आणि अलंकाराचे प्रकार
या पोस्टमध्ये आपण मराठी व्याकरण मधील एक महत्त्वाचा भाग म्हणजेच अलंकार, याविषयी जाणून घेणार आहोत. नेमके अलंकार काय असते? अलंकाराचे किती प्रकार आहेत? आणि अलंकार कशा प्रकारे आपल्याला उपयोगी पडू शकते ही सर्व माहिती जाणून घेऊया.
अलंकार विषय समजून घेण्याआधी तुम्हाला उपमेय आणि उपमान यामध्ये फरक काय आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याची तुलना केली जाते ती एखादी गोष्ट किंवा वस्तू म्हणजे उपमेय आणि त्याच्याशी तुलना केली जाते ती एक वस्तू किंवा गोष्ट म्हणजे उपमान, असे होय. जर उदाहरणावरून समजून घ्यायचं म्हटलं तर " हा आंबा चिकू सारखा गोड आहे". या वाक्यामध्ये आंब्याची तुलना चिकू सोबत केली आहे. वरील वाक्यांमध्ये उपमेय हे आंबा आहे आणि उपमान हे चिकू आहे.
अलंकार म्हणजे काय?
अलंकार या शब्दशः अर्थ आहे दागिना. दागिने मुळे माणसाच्या सौंदर्य खुलून बहरून दिसते त्याच पद्धतीने भाषेचे आहे सौंदर्य सुद्धा अलंकार मुळे चांगले दिसते आणि अलंकार मुळेच भाषेचे सौंदर्य वाढते.
अलंकाराचे मुख्यतः दोन प्रकार पडतात ते म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. चला तर जाणून घेऊ शब्दालंकार आणि अर्थालंकार म्हणजे काय..
शब्दालंकार म्हणजे काय?
तर शब्दांमुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्यांना शब्दालंकार म्हणतात. शब्दालंकार कोणते आहेत? यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आहेत.
Post a Comment