Translate

द्रीपकल्प पठारी प्रदेश व मध्यवर्ती उच्चभुमी-मराठीपीडिया 

द्विपक्लप(Peninsula) हा इंग्रजी शब्द दोन लॅटिन Pene आणि Insula शब्दापासून तयार झाला आहे.Pene म्हणजे जवळजवळ आणि Insula म्हणजे द्रीप होय, म्हणून Peninsula म्हणजे जवळ जवळ दीविप सारखी असणारी भूमी असा अर्थ होतो. द्विपकल्प म्हणजे भूमीचा असा भाग की ज्याच्या तीन बाजू पाण्याने वेढलेल्या असतात.

  • भारतीय द्विपक्लप हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन भूभाग आहे.द्विपकल्पात बराचसा भाग अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे.
  • द्विपकल्पात अरवली पर्वत, छोटा नागपूरचे पठार, पूर्व घाट आणि कर्नाटकांचे पठार (खनिज संपत्र) याश समावेश आहे.पश्चिम घाट हा बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांना वेगळा करतो.


नर्मदा नदी: ही द्विपकल्पीय प्रदेशास दोन भागांत विभाजन करते.
  •  नर्मदा नदीच्या उत्तरेचा भाग : मध्यवर्ती उच्चभूमी आणि नर्मदा नदीच्या दरीच्या दक्षिणेपासून ते महाद्विपाच्या टोकापर्यंतचा भाग दख्खनचे पठार मध्यवर्ती उच्चभूमी.
  • नर्मदा नदीच्या उत्तरेपासून भारतीय मैदानाच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रदेशास मध्यवर्ती उच्च भूमी म्हणतात.


मध्यवर्ती उच्च भूमी प्रदेशाचे उपविभाग : गंगा नदीच्या खोऱ्याचा काही भाग, 2. अरवली पर्वत रांगा,3. पूर्व राजस्थानची उच्चभूमी, 4. माळवा पठार, 5. बुंदेलखंड, 6. वाघेलखंड, 7. छोटा नागपूरचे पठारआणि 8. विंध्य पर्वत रांग आहेत. मध्यवर्ती उच्च भूमीमध्ये उगम पावणाऱ्या नद्या नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात.

अरवली पर्वत :ही अतिप्राचीन पर्वतरांग आहे, ती भारताच्या नैऋत्य-ईशान्य दिशेस आहे.अरवली पर्वतामध्ये सर्वांत उंच शिखर गुरूशिखर आहे.बनास आणि लुनी नदीच्या प्रवाहामुळे अनुक्रमे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील उतारांची धूप झाल्यामुळेवपर्वत रांग खूप झिजली आहे. त्यामुळे त्याचा आकार डमरू सारखा झाला आहे.

पूर्व राजस्थानी उच्चभूमी: ही अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे आहे. या भागातील टेकड्यांची उंची सुमारे 300 मी. आहे.या प्रदेशात चंबळ नदीची उपनदी बनास वाहते.

बुंदेलखंड:हे माळवाच्या पठाराच्या ईशान्येस आहे.बुदेलखंड हे मध्य प्रदेशाचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशाचा दक्षिण भाग यांच्या दरम्यान आहे.बुंदेलखंडात प्रामुख्याने कणाष्म (पॅनाईट) खडक आढळतो. याचा सपाट उत्तर भाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात सहज मिसळता गेला आहे. यमुना खोऱ्याचा एक भाग बुंदेलखंडाने व्यापलेला आहे. 


विंध्याचल-वाघेलखंड: हा प्रदेश बुंदेलखंडाच्या अग्नेयेला आणि माळवा पठाराच्या पूर्वेस आहे.हा प्रदेश टोन्स आणि शोण आणि त्यांच्या उपनद्यांचा आहे.विंध्याचलाचा बराचसा भाग मध्य प्रदेश राज्यात येतो.विंध्याचलाच्या पूर्वेकडे वाघेलखंडाचा प्रदेश आहे. तो मध्य प्रदेशच्या पूर्व भागात आणि छत्तीसगढच्या उत्तर भागात पसरलेला आहे.वाघेलखंडातील उपनद्या अग्नेय दिशेकडून नैऋत्य दिशेकडे वाहतात आणि शोण नदीच्या गर्तेला मिळतात.


छोटा नागपूरचे पठार: याचा मोठा भाग झारखंड राज्यात असून विस्तार पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि ओडिशा राज्यात झालेला आहे.हे पठार खनिज संपत्तीने संपन्न असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे.या पठाराच्या कड्यावरून वाहणाऱ्या जलप्रवाहामुळे प्रेक्षणीय धबधबे तयार झाले आहेत.


विंध्य रांग: याच्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत वेगवेगळे झाले आहेत.या रांगेचा विस्तार मध्य प्रदेशच्या पश्चिम भागापासून ते पूर्वेला बिहार पर्यंत सुमारे 1100 कि.मी. आहे.विंध्य रांगेची सरासरी उंची 450 ते 600 मी. आहे.विंध्य रांगेची दक्षिण सीमा नर्मदा नदीची खच दरी आहे.


हवामान: द्विपकल्पीय पठारी प्रदेशाचे हवामान उष्ण कटिबंधीय आर्द्र, कोरडे प्रकारचे आहे.या पठारी प्रदेशात उन्हाळा खूप उष्ण असून मे महिन्यात 45° पेक्षा जास्त तापमान असते.या पठारातील वार्षिक पर्जन्यमान 750 ते 1500 मिमी आहे.


मृदा: मध्य प्रदेशातील मृदा काळी आहे, ती बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे. चिकणमातीमुळे ओलावा टिकवते.अरवली रांगांमध्ये लाल मृदा आहे त्यात नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय द्रव्यांची कमतरता असते आणि लोहभरपूर प्रमाणात असते.अति पर्जन्याच्या प्रदेशात जांभी मृदा असते, या मृदेत लोहाचे प्रमाण जास्त असते.


नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन: माळवा प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क वने आहेत. त्यात विरळ सागाची जंगले आहेत. मुख्य वृक्ष बाभूळ आणि पळस आहेत.माळवा प्रदेशात सांबर, काळवीट, चिंकारा प्राणी आहेत.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने