Translateआसामचा मैदानी प्रदेश (पूर्वेकडील)-Jio मराठी 
इतर भारतीय मैदानी प्रदेशात पूर्ण आसाम राज्य येते.ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे आसामचा मैदानी प्रदेशाची या खोऱ्याची निर्मिती झाली आहे.या खोऱ्याची निर्मिती जलोढ निक्षेपणामुळे झाली आहे. 

 • निक्षेपणाची जाडी 1500 मीटर आहे.आसामची जीवनवाहिनी ब्रम्हपुत्रा नदी आहे.
 • आसाममध्ये खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, चुनखडक आणि फेल्डस्पार आढळून येतात. 
 • जगामध्ये जैवविविधेने समृद्ध आसाम प्रदेश आहे. प्रदेशातील अनेक परिसंस्था आढळतात.
 • आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे.
 • आसाममध्ये उष्ण कटिबंधीय वर्षासने,पानझडीची वने,गवताळ प्रदेश,बांबूची वने आणि दलदासीन
 • सोनेरी लंगूर, कश्तबदक, बंगाल तणमोर आणि पिग्मी हॉग नामशेष होण्याच्या जातींसाठी आसाम हे एक महत्त्वाचे आश्रयस्थान आहे.वाघ, हत्ती आणि गिबन धोक्यातील प्राण्यांची संख्या आसामात उल्लेखनिय आहे.
 • आसाम राज्याचा राज्यपक्षी पांढऱ्या पंखांचा कश्त बदक हा आहे.आसाममधील जंगली पाणम्हशींची संख्या जगात सर्वांत जास्त आहे.
 • आसामच्या वरच्या भागात चहाचे मळे पुष्कळ आहेत. उच्च प्रतीच्या चहाची पूड येथून युरोप आणि अमेरिकेत निर्यात केली जाते.
 • इ.स. 2011 जनगणनेनुसार आसामची लोकसंख्या 3.12 कोटी आहे.आसामध्ये 45 विविध भाषा बोलणारे भिन्न भिन्न लोक समूह आहेत.
 • आसाममध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रमुख दोन भाषा आसामी आणि बंगाली आहेत.
 • संपूर्ण आसाममध्ये बिहू हा महत्त्वाचा पारंपारिक उत्सव साजरा केला जातो.त्यानंतरचा सण दुर्गापूजा खूप उत्साहाने आसामात साजरा करतात.
 • बिहू आणि इतर उत्सवांशी संबंधित लोकनृत्य आसामात केले जाते.


गंगेचा त्रिभुज प्रदेश
गंगा-ब्रम्हपुत्रेचा त्रिभुज प्रदेश जगातील सर्वांत मोठा प्रदेश आहे. यास सुंदरबनचा प्रदेशही म्हणतात.तसेच या प्रदेशास हरित त्रिभुज प्रदेश असेही म्हणतात. यातील महत्त्वाची बंदरे कोलकाता आणि हल्दिया
आहेत.
 • त्रिभुज प्रदेशात तांबडी आणि तांबडी-पिवळी मृदा आढळते.
 • या त्रिभुज प्रदेशात वितरीका, पाणथळ भाग केनब्रेकस या नावाने ओळखतात. हे गवत आर्द्र क्षेत्रात वाढते.
 •  बंगालच्या उपसागराजवळ सुंदरबन हे पाणथळ भागातील जंगल आहे.जगातील सर्वात जास्त कच्छवृक्ष (खारफुटी)क्षेत्र हे सुंदरबनामध्ये आहे.
 • खारफुटी वृक्षांनी व्यापलेले क्षेत्र सुमारे 20,400 चौ.कि.मी. आहे. उदा. सुंद्री, गर्जन, बांबू वृक्ष.सुंदरबनमध्ये भारतीय अजगर, वाघ, हत्ती आणि मगरी आढळतात. तसेच खंड्या, गरूड, सुतार पक्षी आहेत.
 • नदीतील डॉल्फीन आणि समुद्री डॉल्फीन, माशाच्या जाती सुंदरबनात आढळतात.
गंगेचे मैदान (मध्यवर्ती)
उत्तरेकडील हिमालयपर्वत आणि दक्षिणेकडील द्विपकल्पीय पठार यांमध्ये 1050 किमी लांबीचे पूर्व-पश्चिम गंगेचे मध्यवर्ती मैदान आहे.
 • गंगेच्या मध्यवर्ती मैदानात हरिद्वार, मथुरा, प्रयाग (अलाहाबाद), काशी (वाराणशी) आणि गया ही पवित्र शहरे आहेत.
 • गंगेच्या उगमस्थानाकडील मैदानात पश्चिमी उत्तर प्रदेशाचा समावेश होतो.
 • गंगेच्या मध्य बाजूची मैदाने सुमारे 600 कि.मी. लांब आणि 330 किमी रुंद पट्टात पूर्व उत्तरप्रदेश आणिबिहार मध्ये विस्तारली आहेत.
 • गंगेच्या मुखाकडील मैदानी प्रदेश म्हणजे पश्चिम बंगालचा भाग होय.
गंगेचा मध्य मैदानी प्रदेश
एकजिनसी, कमी उंचीचा, नैसर्गिक बांध, नागमोडी वळणे, नालाकृती सरोवरे यांचा आहे.
 • जलपैगुरी आणि दार्जिलिंग टेकड्यांच्या पायथ्यालगतच्या कमी उंचीच्या प्रदेशास दुआर असे म्हणतात.दुआर प्रदेशातून भूतानला जाण्याचे मार्ग गेले आहेत.
 • हिमालयात उगम पावणारी गंगा आणि तिच्या उपनद्या - यमुना, रामगंगा, घागरा, गंडक, कोसी आणि गोमती या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत.
 • चुंबळ नदी द्विपकल्पीय पठारावर उगम पावून यमुना नदीस येऊन मिळते.शोण, कोसी आणि घागरा या नद्या पुराचे थैमान घालतात आणि सतत प्रवाह बदलतात.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने