Translate

पचायला जड आहे.

Don't throw food

उत्पादन/शेती करायला मनुष्यबळ कमी पडले तर कुठून येईल पुरवठा, वर पावसाळा येईल त्याबरोबर किती अडचणी येतील सांगता येत नाही. पाणी, वीज, अन्न सर्व जपून वापरा नंतर शहाणपण येऊन फार उशीर झाला असेल.

 सावध आणि सजग व्हा.. ही बराच काळ चालणारी लढाई आहे, आत्ता तर फक्त रोगाचे थैमान आहे, त्याचे आर्थिक व्यवस्थेला बसणारे फटके भर घालतील. त्यात भरीला बदलणारे मोसम असतील हे सर्व नवे प्रश्न ,आव्हाने घेऊन येतील.

तूरडाळ-मूगडाळ दीडशे दोनशे रुपये किलो होतेय आमच्या शहरात. साखर पन्नास तरी रुपये नि शेंगदाणे एकशे ऐंशी रुपये किलो.
संकट संपलं तरी ही महागाई काही काबूत येईल की नाही देव जाणे. सगळ्याच गोष्टींवरचा बोजा वाढतोय एवढं लक्षात येतंय.

रोजचं, साधं, ताजं, पोषणमूल्य असलेलं अन्न खाणं बरं. वरण भात पोळी भाजी कोशिंबीर इत्यादी.
वेळीच सावध होऊन अनावश्यक चमचमीत, मसालेदार, जड पदार्थ करून खाणं टाळा.
भसाभस किराणा घेऊन संपवू नका.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने