Translate

बाजारात सामान खरेदी करताना कॅरी बॅगसाठी वेगळा चार्ज भरावा लागतो

आता दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल तर तक्रार करता येणार.

दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल तर तक्रार करता येणार.
कॅरी बॅग

बाजारात सामान खरेदी करताना कॅरी बॅगसाठी वेगळा चार्ज भरावा लागतो. मात्र सरकारने देशातील ग्राहकांना आजपासून काही अधिकार दिले आहेत. नव्या कायद्यानुसार, दुकानदाराने पिशवीसाठी पैसे आकारल्यास, ग्राहकाला याची तक्रार करून, त्यावर कारवाई करता येणार आहे.


केंद्र सरकारने दिलेल्या माहिती प्रमाणे नव्या कायद्यानुसार, कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे आता दंडनीय असणार आहे. कॅरी बॅगच्या नावाने 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये आकारले गेल्यास, त्यासाठी दंडाची तरतूद केली आहे.


ग्राहक मंचाने पिशवीसाठी पैसे आकारल्यास दुकानदारावर दंड आकारण्यास याआधी पण सुरुवात केली होती.दरम्यान आता या नव्या कायद्यात आणखी कठोर तरतूदी करण्यात आल्या आहेत. आणि महत्वाचे म्हणजे यासाठी ग्राहकांना देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात खटला दाखल करण्याचा अधिकार असेल असे स्पस्ट करण्यात आले. आपण या आणि या व्यातिक्त देखील इतर अडचणी साठी.


एक ग्राहक म्हणून [1800114000】या हेल्पलाईन वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता - दरम्यान आता देशात कोठेही सामान खरेदी केल्यानंतर दुकानदाराला पिवशी साठी अतिरिक्त पैसे आकारता येणार नाहीत. हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच महत्वाची आहे. आपण इतरांना देखील शेर करा 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने