Translate

या वर्षा पासून बारावीसाठी इंग्रजीची एकच प्रश्नपत्रिका राहणार बहुसंची(सेठ) प्रश्नपत्रिका पद्धत बंद होणार. यावर्षी पासून बारावीच्या इंग्रजी विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत बंद होणार आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणेच असणार आहे.



याविषयीची माहिती   उच्च माध्यमिक आणि राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. मंडळाने दिलेल्या माहिती नुसार आता वर्ष 2020-21 च्या बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये बारावीची पहिलीच परीक्षा पार पडणार आहे. बहुसंची प्रश्नपत्रिका म्हणजे सेट (ए,बी,सी,डी)हा पॅटर्न 2004 पासून चालत आला होता,आता नवीन अभ्यासक्रमा नुसार उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संच बंद केली आहे. नव्या अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी यापुढे एकच प्रश्नपत्रिका छापण्यात येणार आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी मात्र बहुसंची प्रश्नपत्रिका संच देण्यात येणार आहे. मात्र त्यांना सुद्धा हा पर्याय केवळ फेब्रुवारी 2021 मध्ये होणाऱया परीक्षेसाठीच मिळणार आहे.दरम्यान आता बारावीच्या परीक्षा मध्ये थोडे बदल झाले आहेत.


यापुढची माहिती येणाऱ्या पोस्टमध्ये आपण बघूया.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने