NEET Chi Mahiti
लहानपणापासून आपण एक स्वप्न पाहतोय ते म्हणजे डॉक्टर व्हायचं. प्रत्येकाला असं वाटतं की मी जर डॉक्टर झालं की जीवनातले सगळे आजार मी बरोबर करू शकतो. तर मला ज्या आजार बरे करायचे त्यासाठी मला नक्कीच डॉक्टर व्हावा लागेल. तर ह्या जीवनाची सुरुवात ही कुठून होते? कशी होते? आणि मी कसा डॉक्टर बनू शकतो. हे सगळं वाचून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर खालची पोस्ट पूर्ण वाचा. ती नक्कीच तुम्हाला मदत करेल तुमच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी. या पोस्टमध्ये नीट (NEET) म्हणजे काय? नीट एक्झाम माहिती.
नेट ही एक्झाम 2019 पासून (NTA) एनटीएद्वारे घेतली जाते. याआधी ही एक्झाम सीबीएससी (CBSE) घेत होते. नीट चा फुल फॉर्म नॅशनल एलिजिबिलिटी कम इंत्रन्स टेस्ट असा होतो. ही इंट्रान्स परीक्षा देण्यासाठी तुम्हाला अकरावी मध्ये बायोलॉजी हा सब्जेक्ट असणे खूप गरजेचा आहे. जर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल त्यासाठी तुम्हाला एक तर तुमचा जनरल ग्रुप म्हणजेच पीसीबी (फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी) हा विषय ग्रुप असणे खूप गरजेचे आहे.
जर तुम्ही नीट एक्झाम उत्तीर्ण केली तर तुम्ही एमबीबीएस(MBBS), बीडीएस(BDS), बीएएमएस(BAMS) बी एच एम एस(BHMS) किंवा बीड पीडी(BPT) यासारखे कोर्स मध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊन तुम्ही तुमचे कौशल्य दाखवू शकता. आता हे कोर्स घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नीट एक्झाम च्या एंट्रन्समध्ये चांगली गुणवत्ता लागते तेव्हाच तुम्ही त्या कोर्ससाठी नाव नोंदवू शकता.
NEET Exam Pattern
आता ह्या परीक्षेचा चा पॅटर्न कसा असतो? त्याच्या मध्ये तुम्ही मुख्यता तीन सब्जेक्ट असतात. जसे की मी सांगितलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. पण बायोलॉजी ला दोन भागांमध्ये विभागणी केलेली असते. यामध्ये शिक्षक तुम्हाला एक बॉटनी हा सब्जेक्ट शिकवतात त्याच्यानंतर दुसरा झूलॉजी मुख्यता बायोलॉजी चे विभाग आहे. हा सिल्याबस पूर्ण एनसीआरटी अकरावी बारावी वर्गांवर अवलंबून असतो.
ही परीक्षा एमसीक्यू (MCQ) म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप मध्ये येते. यामध्ये तुम्हाला एका प्रश्नाचे चार ऑप्शन असे उत्तर दिलेले असतात. त्यापैकी योग्य तो पर्याय निवडून तुम्हाला उत्तर सिलेक्ट करायचा असतो. जर तुम्ही योग्य हा पर्याय निवडला टिक केला तर तुम्हाला याचे गुण मिळतील. आणि या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जर तुमचा एखादा उत्तर चुकलं तर त्याचे मायनस पॉईंट तुमच्या बरोबर उत्तरामधून कमी केले जातात. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल जर माझं उत्तर चुकलं असेल तर किती माझे मार्क कापल्या जातात?
NEET Question Paper Marks and syllabus
आणि ही परीक्षा सोडवण्यासाठी तुम्हाला तीन तास म्हणजेच 180 मिनिटं दिले जातात. ज्यामध्ये तुम्हाला एक प्रश्नाला एक मिनिट दिला जातो.
