Translate

१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये सुरु होणार, यूजीसी चे नियम लागु करण्यात आले- मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे

१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये सुरु होणार, यूजीसी चे नियम लागु करण्यात आले
school Sanitize

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात संशोधक पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत असे आयोगाने म्हटले याबाबतच्या मार्गदर्शक प्रसिद्ध झाल्या आहेत.


 23  नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू होणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री.


राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आली आहे. त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे - मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर 23 नोव्हेंबरपासून राज्यतील शाळा चालू होतील असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. सध्या शाळांना १२ ते १६ नोव्हेंबपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर झाली आहे. दरम्यान राज्यात शाळा चालू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्या आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहचवू . दरम्यान शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला हि माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा .


गाईडलाइन्स व नियम काय आसतील?

  1. विद्यार्थ्यांचे वर्ग आधी 50 टक्केच उपस्थितीत सुरू करावेत.इतर विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाईन घेण्यात यावी, परंतु त्यांनी गटागटाने अधूनमधून प्राध्यापकांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
  2. प्रवेशद्वारावर थर्मल सक्रीनिंग करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा तसेच वर्गांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे तसेच महाविद्यालयात सोशल डिस्टन्सिंग राखता येऊ शकेल अशाच खेळांना परवानगी द्यावी.
  3. विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना मास्क अनिवार्य आहे तसेच बाहेरच्या व्यक्तींना शक्यतो संस्थेत प्रवेश देऊ नये , तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका टाळाव्यात.
  4. वसतिगृहे उघडली तर त्यात रूम-शेअरिंगला परवानगी नाही तसेच वसतिगृहांमध्ये परतणाऱया विद्यार्थ्यांना 14 दिवस क्वारंटाइन ठेवावे.
  5. निवासी विद्यार्थी आणि शिक्षकांनी संस्थेबाहेर जाणे शक्यतो टाळावे त्यांना अत्यावश्यक वस्तू संस्थेमध्येच उपलब्ध करून द्याव्यात.
  6. विद्यार्थी किंवा शिक्षण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तातडीने आयसोलेट करावे आणि त्यांच्या उपचारांची सोय संस्थेने करवी तसेच जर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर वर्ग घेणे बंद करावे.
  7. वसतिगृहातून बाहेर पडण्यास विद्यार्थ्यांना मनाई करणे, मेसमधून जेवण बाहेर देणे बंद करणे अशा उपाययोजना परिस्थितीच्या तीव्रतेप्रमाणे कराव्या असे आयोगाने स्पस्ट केले.Post a Comment

Previous Post Next Post