Translate

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फटाके आणि दिवाळी बाबत राज्याला संबोधन

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फटाके आणि दिवाळी बाबत राज्याला संबोधन.

करोना आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. दिवाळीत फटाके फोडण्याआधी विचार करा बंदी घालण्यापेक्षा सामंजस्याने फटाके वाजवायचे नाहीत हे ठरवा. सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवायचे नाहीत.दिल्लीत प्रदूषण वाढलंय प्रदूषणामुळे कोरोनाचा विषाणू घातक परिणाम होत आहे .


रोषणाई जरूर करा, दिवे पेटवा, पण फटाके वाजवू नका आपल्या परिसरात कुणाला त्रास होणार नसेल तर वाजवू शकता.एक कोरोना रुग्ण मास्क न घातल्यास गर्दीत फिरल्यास तो 400 जणांना संक्रमित करतो. त्यामुळे तुम्हाला मास्क घालावाच लागेल. मास्क न घातल्यास दंडहि आकारला जाईल.दिवाळीनंतरचे 15 दिवस फार कसोटीचे आहेत असे ते म्हणाले .


आरक्षणाचे वारे वाहत आहेत. धनगर, ओबीसी या सगळ्यांच्या मागण्या आहेत. आपण कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्राकडे बोलणं सुरू आहेत. पीयूष गोयल चांगलं सहकार्य करत आहेत दरम्यान राज्यात नववी ते बारावी शाळा, कॉलेज सुरु होतील .जून ते ऑक्टोबरमध्ये राज्यातील ४१ लाख हेक्टर जमीन बाधित झाली सरकारनं पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपये जाहीर केलेत, तसेच महिनाअखेर पर्यंत कापसाची खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.


दिवाळीनंतर राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्यासाठी नियमावली तयार करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मंदिरात कमीत कमी गर्दी करण्याची नियमावली येणार , असे ते म्हणाले आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने