सध्या पाण्यापेक्षाही स्वस्त झाल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती
युरोपमधल्या अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तेलाच्या किमतीत घट झाली आहे. सध्या खनिज तेलाचा दर ३७ डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी कमी झाल्या आहेत.
सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 37 डॉलर आहे म्हणजे एका बॅरलमध्ये 159 लिटर तेल असते. आजच्या स्थिती मध्ये एका डॉलरची किंमत 74 रुपये आहे - याचा अर्थ एका बॅरलची किंमत 2733 रुपये आहे. तर एक लीटरमध्ये त्याची किंमत 17.18 रुपयांच्या जवळ येते - पाण्याचा विचार करता आपल्या देशात पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपयाच्या जवळपास मिळते.
पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त झाले आहे.आता साहजिकच यामध्ये विविध प्रकारचे टॅक्स ऍड केल्यानंतर पेट्रोलच्या किमती मध्ये वाढ होते. काल म्हणजे दी. 2 नोव्हेंबर सोमवारी पेट्रोल (87.40) रुपये प्रति लिटर तर डिझेल (75.40) रुपये प्रति लिटर झाले आहे.
दरम्यान याआधी आपण पेट्रोल डिझेल वर लागणाऱ्या टॅक्स बद्दल खूप व्यवस्थित समजून घेतलेले आहे . त्यामुळे ती माहिती परत नाही दिली. साहजिकच पेट्रोल डिझेल बद्दलचे हे नॉलेज अपडेट आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे.आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Post a Comment