Translate

केंद्र सरकार देशात सुरु करतेय 1000 LNG पंप.

केंद्र सरकार देशात सुरु करतेय 1000 LNG पंप पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे
LNG in India 


आपल्या देशात आता पेट्रोल पंपांप्रमाणेच आता एलएनजी पंपही सुरू झाले आहेत , सरकार या प्रकल्पासाठी सुमारे 10,000 कोटींची गुंतवणूक करीत आहे , पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे.

सध्या आपल्या देशात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि ऑटो एलपीजीचा वापर वाहन इंधन म्हणून केला जात आहे , मात्र आता एलएनजी म्हणजे लिक्विड नॅचरल गॅस चा वापरही इंधन होत आहे. एकदा एलएनजी टाकी भरली की अशी वाहने आरामात 600 किमी ते 800 किमी पर्यंत जाऊ शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ते डिझेलच्या दरा पेक्षा 30% ते 40% स्वस्त राहते. 


देशात प्रयोगिकतत्वावर 50 एलएनजी स्थानकांचे काम सुरू झाले आहे. तर केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे आणखी 1000 एलएनजी पंप सुरु करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांसाठी याविषयीची माहिती पेट्रोनेट तसेच इतर पेट्रोलियम कंपन्यांच्या वेबसाइटवर उलपद्ध होणार आहे. तसे काही दिवसापूर्वी पेट्रोल पंप चालू करण्यासाठी पात्रता सविस्तरपणे पद्धत समजून घेतली होती.


 पेट्रोल पंप आणि LNG पंप सुरु करण्याबातचे आणखी काही अपडेट आले , तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू  दरम्यान देशात आणखी एलएनजी पंप सुरु होत आहेत , हि माहिती आपल्यासाठी नक्कीच महत्वाची आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने