Translate

रेपो दरात बदल होणार नाही - गव्हर्नर शक्तिकांत दास.

रेपो दरात बदल होणार नाही - गव्हर्नर शक्तिकांत दास
शक्तिकांत दास


आज मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, रेपो रेट कोणताही बदल केला जाही , तसेच देशातील महागाईचा दर जास्त राहण्याची शक्यता आहे, दरम्यान गरज पडल्यास भविष्यात व्याजदरात बदल करता येईल असही ते आज म्हणाले.  


किती आहेत रेपो रेट? 

आज जाहीर झालेल्या रेट प्रमाणे , सध्या रेपो दर 4%, रिव्हर्स रेपो दर 3.35%, कॅश रिझर्व्ह रेशो 3% आणि बँक रेट 4.25 टक्यावर आला आहे.

रेपो रेट म्हणजे काय ? त्याचा आपल्याला काय फायदा ?

तुम्हला माहिती असेल बँकांना दररोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची गरज असते ,आता ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते.

तशी रेपो रेट म्हणजे काय याविषयीची माहिती आपण याआधी देखील घेतली आहे, मात्र होऊ शकते काही लोकांसाठी हि संकल्पना नवीन असेल.

दरम्यान या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. आता होते असं कि, बँकांन रिझर्व्ह बँकेकडून कर्ज जर कमी व्याजदराने मिळत असेल तर बँका पण आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात म्हणजेच जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले तर बँकाही आपले कर्जाचे दर वाढतात , म्हणजेच साहजिकच रेपो रेटचा आपल्या बँकिंग व्यवहारावर परिणाम होत असतो.  

आता रेपो रेट हा 4 टक्क्यावर स्थिर राहणार हि माहिती ,आणि हे नॉलेज अपडेट्स प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post