Translate

आता आपला मोबाईल नंबर चे अंक बदलणार TRAI काढतंय नवा नियम. 

Now mobile number digts changeing according to TRAI

आपल्या सगळ्यांचे मोबाईल नंबर दहा अंकी होता आता तो अकरा अंकी होणार आहेत. यासंदर्भात TRAI म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार TRAI  ने म्हटलं आहे कि जर 10 ऐवजी 11 अंकी मोबाईल नंबर वापरला तर जास्त फोन नंबर तयार होऊ शकतील. तसेच फिक्स लाईनसाठी फोन करताना मोबाईलनंबर आधी शुन्य लावण्यात यावा असंही सांगितलं आहे.


देशात सध्या दहा आकड्यांचे 210 कोटी कनेक्शन आहेत. जे सात , आठ  आणि नऊ नंबरने सुरु होतात. TRAI ने  आता नवीन राष्ट्रीय नंबर योजना सुचवली आहे. ही योजना लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. यानुसार डोंगल वापरणाऱ्यांसाठी 13 तर मोबाईल धारकांसाठी 11 अंकी नंबर असेल असंही TRAI नं म्हटलं आहे.


१ जानेवारीपासून लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्याच्या नियमात होणार बदल .

१ जानेवारीपासून लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्याच्या नियमात होणार बदल. येत्या नवीन 2021 वर्षामध्ये देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबर वर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. 

आता ट्राय’ च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी ,मोबाईल नंबरआधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल. तसे आपण TRAI बद्दल म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया बद्दल अगोदर माहिती घेतलेली आहे , दरम्यान आता ट्राय’ च्या आदेशानुसार , लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य डायल करावा लागेल , ‘TRAI ’ चा हा नवा आदेश 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे.

आता १ जानेवारीपासून एखाद्या व्यक्तीने शून्य न लावता लँडलाइनवरुन मोबाईल नंबरवर फोन लावल्यास तो कनेक्ट होणार नाही. तसेच कंपनीने आधी दिलेल्या माहितीप्रमाणे भविष्यात टेलिकॉम कंपन्याचे 11 अंकी मोबाइल नंबरही जारी होतील, सध्या देशात मोबाईल ग्राहकांची संख्या वेगाने वाढतेय,  त्यामुळे 10 अंकी मोबाईल नंबर कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे . 11 अंकी नंबर आल्यास देशात २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होईल जी भविष्यातील गरजा पूर्ण करेल. १ जानेवारीपासून येत असलेला नियम 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने