Translate

झुडपी जंगले असलेल्या मराठवाड्यातील काही भागांत आढळणारा नवरंग पक्षी परभणी - हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी परिसरात आढळला.त्याला इंग्रजीत Indian Pitla, तर शास्त्रीय भाषेत Pitta brachyuran असे संबोधले जाते. या पक्षाची नर- मादी दिसायला सारखीच असते. नवरंग पक्षी आकाराने साळुकीएवढा असतो. त्याच्या अंगावर पांढरा, काळा, हिरवा,निळा, पिवळा, लाल, केशरी आदी.रंग गडद स्वरूपात दिसून येतात.


नवरंग पक्षी 


हा पक्षी उडताना त्याच्या पंखाच्या टोकावर पांढरे ठिपके दिसतात. तो 'व्हीट-ट्यू' असा आवाज काढतो.भारतातील सर्व झुडपी जंगलांच्या भागात त्याचे वास्तव्य आढळते. देशांतर्गत स्थलांतर करणारा हा पक्षी मे च्या सुमारास महाराष्ट्राला भेट देतो. त्याचा विणीचा काळ मे ते ऑगस्ट दरम्यान असतो. नवरंग संपूर्णपणे कीटकभक्षक पक्षी आहे.

 

पक्षी निरीक्षक तथा अभ्यासक अनिल उरटवाड यांच्यासह यांच्या सहकान्यांनी त्याच्या आगमनाची नोंद केली आहे. येलदरी परिसरात वेगवेगळ्या पक्षांची नोंद केली जाते. कधी परदेशी तर कधी देशांतर्गत भटकंती करणारे अनेक पक्षी या परिसरात येत असतात. त्यामुळे निरीक्षणासाठी येलदरी, नेमगिरी परिसरात पक्षीमित्रांची नेहमीच वर्दळ असते. या परिसरातील पक्षी अभ्यासक अनिल उरटवाड,गणेश कुरा, पुष्पराज मांडवगडे आदींचा त्यात समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने