26/10 ठळक बातम्या,शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण,Jio 222 चा पैक आता 255 रुपयाला
1. मोठी बातमी ! देशाच्या रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे, गव्हर्नर यांनी स्वतः ट्विट करून हि माहिती दिली.
2. रिलायन्स जीओने आपल्या 222 रुपयांच्या Disney Hotstar पॅकची किंमत वाढवली या पॅक मध्ये 33 रुपयांनी वाढ झाली तर हा पॅक आता 255 रुपयाला झाला आहे.
3. देशभरातील चार हजार लष्कराच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्कॉचसारखे विदेशी मद्य, मोबाईल लॅपटॉप , शुज सारख्या अनेक विदेशी वस्तू आता मिळणार नाहीत केंद्र सरकारने मिलिट्री कॅन्टीनमध्ये विदेशी वस्तूंच्या खरेदी विक्रीला बंदी घातली आहे.
4. केंद्र सरकारने अखेर मोराटोरियम(अधिस्थगन) प्रकरणात कर्जदारांना दिलासा दिला आहे. मोराटोरियम काळातील चक्रवाढ व्याज सरकार भरणार आहे. यानुसार ज्यांनी मोराटोरियम घेतले नाही त्यांनाही हा लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या कर्जदारांनी मोराटोरियम काळात हप्ते भरले त्यांना कॅशबॅक देण्यात येणार आहे
5. केंद्र सरकारच्या कांदा आयात करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर मोठे आंदोलन होऊ शकते. परंतु राज्यातील कोणत्याही बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार नाही. ही माहिती कांदा उत्पादक संघटन अध्यक्ष "भारत दिघोळे" यांनी दिली.
6. राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे 2019 मध्ये तलाठी भरती राबवली होती. त्याअंतर्गत अनेक पदांची भरती होऊन उमेदवारांची अंतिम निवड केलेली नाही. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून त्यासंदर्भात मार्गदर्शन मागविले आहे.
7. भारतात कोरोना रिकव्हरी रेट सध्या 90 टक्क्यांवर पोहचला. तसे देशभरात आतापर्यंत जवळपास 71 लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेत .
8. देशातील पहिली सीप्लेन सेवा येत्या 31 ऑक्टोबरला गुजरातमध्ये सुरू होणार आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होईल. याविषयीची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली.
Post a Comment