मतदार ओळखपत्रासाठी चालू झाली नवीन वेबसाईट
मतदार ओळखपत्रासाठी आता आपण घरी बसून देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच आपल्या कार्ड मध्ये हवे असलेले बदल देखील करू शकता. कारण आता मतदान कार्ड साठी आणखी एक वेब पोर्टेल सुरु करण्यात आले आहे.
मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराची अलीकडील छायाचित्रे अशा काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता असेल तसे पाहिले तर आपण मतदान कार्डसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी voterportal.eci.gov.in हे नवीन पोर्टल सुरु झाले आहे. यावर जाऊन आपण मेल आयडी अथवा फेसबुक ने लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर आपण नवीन कार्ड तयार करण्यासाठी घरीच ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच जुन्या मतदान कार्ड मध्ये बदल देखील करू शकता.
आपल्या मतदान कार्ड संबंधित काही मदत हवी असल्यास [1950】 या नंबर वर कॉल करून मदत घेऊ शकता. मतदार ओळखपत्रासाठी सुरु झालेली हि नवीन वेबसाईट आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची.
Post a Comment