Translate

आता घरबसल्या कळणार बसचे लोकेशन एसटी महामंडळाची नवीन सर्व्हिस

आता घरबसल्या कळणार बसचे लोकेशन एसटी महामंडळाची नवीन सर्व्हिस
बस ट्रैकर


बस आगार किंवा स्थानकात गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे हाल आता बंद  होणार आहे.  कारण महामंडळाच्या सर्व बसमध्ये आता व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवायला सुरवात झाली आहे. त्यामुळे एसटी लोकेशन आता मोबाईलवरही देण्यात येणार आहे. आपण या सर्व्हिस ची माहिती ऑगस्ट २०१९ मध्ये घेतली होती त्यावेळेस तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्हीटीएस प्रणालीची घोषणा केली होती.


दरम्यान सध्या महामंडळाच्या ताब्यातील १८ हजारांपैकी १६ हजार गाड्यांना ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. महामंडळाने दिलेल्या माहिती प्रमाणेनोव्हेंबरच्या शेवटपर्यंत ही यंत्रणा पूर्णपणे लागू होणार आहे. त्यानंतर डिसेंबरपासून ही प्रणाली प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पाहले तर बऱ्याच वेळेस एखादी बस स्थानकात वेळेवर पोचत नाही. त्या गाडीला अनेक कारणांमुळे उशीर होतो. त्याचा परिणाम अन्य बससेवरही होतो मात्र आता असे होणार नाही.

आता या नवीन यंत्रणेमुळे धावत असलेल्या एसटीचा संपूर्ण ठावठिकाणा प्रवाशांना मोबाईलवरच समजेल तशी या यंत्रने विषयी आणखी काही माहिती अली तर ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू .


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने