Translate

हॉटल,बार आणि रेस्टॉरंट सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालणार

हॉटल,बार आणि रेस्टॉरंट रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालणार
हॉटल,बार आणि रेस्टॉरंट


मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य शासनाने तीन ऑक्टोबरपासून नवीन आदेश काढले आहेत. याआदेशानुसार हॉटेल,बार, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.त्याचाच संदर्भ देत शहरासाठी हे स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत.


महापालिका क्षेत्रातील हॉटल,बार आणि रेस्टॉरंट सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.कोरोणाचे गांभीर्य लक्षात घेता  सिनेमाघृ,जलतरण तलाव,उद्यांने,असेब्ली होल यांची सुर करण्याची परवानगी आजुन दिली नाही.


औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील मैदानी खेळ जसे क्रिकेट,खो-खो, बॅडमिंटन, या खेळाचे फक्त सराव साठी परवानगी देण्यात आली आहे क्रीडा स्पर्धा घेणे, उपक्रम राबवणे, संमेलन घेणे, सामाजिक कार्यक्रम,शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम याना बंदी राहील.

महापालिकेनी असं सांगितले आहे की जास्त गर्दी करू नये व जास्त गर्दी केल्यास त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई केली जाईल.जो कोणी मास्क घालणार नाही,सुरक्षित वावरणार नाही व नियमांचे पालन करणार नाही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी केली जाईल. 

आगामी काळात शहरातील विविध क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू होण्याची चिन्हे असताना साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षण शिबिरातील तीन खेळाडू हे पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्यामुळे सर्व नियमांचे आणि सोशल डिस्टन चे पालन करा जेणेकरून तुम्ही व तुमचा परिवार सुरक्षित राहिल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने