Translate


खुशखबर ! आता रेड झोनमध्येही Amazon, Flipkart ची सर्व्हिस सुरू राहणार लॉकडाउन च्या चौथ्या टप्प्यात ई-कॉमर्स कंपन्यांची सर्व्हिस कन्टेंन्मेंट झोन सोडून बाकी सर्व झोन मध्ये चालू राहणार आहे .तसेच ई-कॉमर्स कंपन्यांना आतापर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी होती.आता सर्वच सामानाची विक्री* करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये ट्रेन प्रारंभ

सगळ्यांसाठी 1 जून पासून सुरू होणार ट्रेन्स, दररोज धावणार 200 गाड्या केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मोठी घोषणा केली येत्या १ जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तश्या देशात अडकून पडलेल्या लोकांसाठीही काही गाड्या चालविण्यात आल्या होत्या पण सगळ्यांना प्रतिक्षा होती ती सर्वसामान्य प्रवाशांसाठी ट्रेन्स केव्हा सुरू होतील याची.तर हि  प्रतिक्षा आता संपली म्हणजे १ जून पासून ट्रेन्स सुरू होणार आहे अशी माहिती  रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली 

कोरोना पेशंट  In Aurangabad 

।। कोरोना अपडेट
औरंगाबाद मध्ये आज सकाळी परत ४१ नवे रुग्ण सापडले - पहा सविस्तरऔरंगाबाद मध्ये आज बुधवारी सकाळी ४१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात  कोरोनाबाधितांची एकूण संख्या *१ हजार ११७* झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले 

पहा नवीन रुग्ण कुठचे आहेत* (कंसात संख्या दिली आहे)

औरंगाबाद जिल्ह्यात आढळलेल्या नव्या रुग्णांत गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (१), न्याय नगर, गल्ली नं. ७ (२), पुंडलिक नगर, गल्ली नं ७ (१), तसेच पोलिस कॉलनी मधील  (२), लिमयेवाडी, मित्र नगर (१), शरीफ कॉलनी (१), न्याय नगर, गल्ली न.१ (१), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (३), मराठा गल्ली, उस्मानपुरा (२),  आणि कैलास नगर, गल्ली नं.२ मधील  (३), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.५(२), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (२), इंदिरा नगर (१), खडकेश्वर (१),  त्याचबरोबर माणिक नगर मधील  (१), जयभीम नगर (४), पुंडलिक नगर (५), जिल्हा सामान्य रुग्णालय (१), संजय नगर (१), सिटी चौक (१), बालाजी नगर (१), आझम कॉलनी (१) .तसेच  *फुलंब्री* तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती मधील २ जण , *कन्नड* तालुक्यातील धनगरवाडी, औराळा मधील १  जण कोरोनाबाधित आहेत. 


आपण हे अपडेट - इतरांना पण शेअर करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने