अव्यय आणि प्रकार: क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार, कालवाचक, स्थलवाचक, रितीवाचक, संख्यावाचक परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय

अव्यय आणि प्रकार

अव्यय आणि प्रकार: क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार, कालवाचक, स्थलवाचक, रितीवाचक, संख्यावाचक परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय

शब्दाच्या मुख्य ते आठ जाती असतात, आणि जे दोन प्रकार मध्ये येतात. म्हणजे विकारी शब्द आणि अविकारी शब्द. विकारी शब्द म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल विकारी आणि अविकारी म्हणजे काय?

विकारी: ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल होतात त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्या शब्दांमध्ये रूपांतर होते किंवा बदल होते म्हणून यांना विकारी असे म्हणतात. अविकारी: ज्या वाक्यामध्ये शब्दांच्या रूपामध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात.

अविकारी शब्दांचे प्रकार 

क्रियाविशेषण अव्यय

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्दाला "क्रियाविशेषण अव्यय" असे म्हणतात. उदाहरण अर्थ समजून घ्या "तू परवा ये". यामध्ये येण्याची क्रिया. या वाक्यामध्ये परवा लिहिलेला नसतं तर आपल्याला कळालं नसतं की कधी येयाच. क्रियापदा बद्दल विशेष माहिती कोण देत आहे? "परवा" मग क्रियाविशेषण अव्यय कोण झालं समजलं?  

उदा:
ती हळूहळू चालते
ती उद्या करेल.
त्याने छोटे काम केले.
मी खूप खाल्ले. 


क्रियाविशेषण अव्यय मध्ये चार प्रकारे येतात.
  • कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
  • स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
  • रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय
  • संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

काळ किंवा वेळ यांच्या क्रिया बद्दल विशेष माहिती सांगतो त्यालाच कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा: काल, आज, परवा इत्यादी.

उदा:
मी काल पळलो.
तू आता घे.
ती सकाळी उठली.

वरील उदाहरणांमध्ये काल, आत्ता, सकाळी हे जे गोष्टी आहेत. त्या काळानुसार अवलंबून असल्यामुळे आणि त्या क्रियाविशेषणाबद्दल विशेष माहिती सांगत आहे म्हणून याला कालवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात.


स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

ठिकाण किंवा स्थळ जे शब्द क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.उदा: दूर, तिथे, मागे, पुढे,अलीकडे, पलीकडे, इत्यादी

उदा:
त्याने अलीकडे पाय ठेवला.
तो जवळ आला.
तिला दूरचे दिसते.

रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय

रीत चले और सतत चले म्हणजेच याच्या वाक्यामध्येच तुम्हाला रितीवाचक भेटेल, म्हणजे अर्थात क्रियाची रीती दाखवणाऱ्या शब्दाला रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा: झटकन, लगेच, खरोखर, इत्यादी

उदा:
तो खोटं खोटं बोलतो.
तो सावकाश धावतो

वरील वाक्यामध्ये खोटे-खोटे, सावकाश हे जे पद्धत असेही म्हणतो आणि ते क्रियेबद्दल विशेष माहिती देणार देतात म्हणून यांना रेतीवाचक असे म्हणतात.


संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय

एखाद्या क्रियाचा परिणाम आणि एखादी क्रिया किती वेळेस घडली हे दर्शवत असेल त्या शब्दांना परिणाम वाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा: तीनदा, रोज, छटाकभर, इत्यादी

उदा:
मी चारदा पेपर दिला.
मी मोजकेच केले.

वरील वाक्यामध्ये संख्यावाचक आणि परिणाम वाचक म्हणजेच चारदा मोजके ही कसे क्रियाविशेषण अव्यय मध्ये येतात कोणत्या संख्यावाचक.

Post a Comment

Previous Post Next Post
Design by - Jiomarathi | Templatelib