Translate


 SBI च्या 42 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी.आता ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प राहणार - केवळ ATM सेवा राहतील चालू, भारतीय स्टेट बँक ची ऑनलाईन सेवा काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे.
काल १३ ऑक्टोबरला बँकेने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. या समस्येपासून एटीएम मशीन लांब आहेत - असे बँकेने सांगितले.

 

आणखी काय सांगितले SBI ने?


 13 ऑक्टोबरला योनो एसबीआय रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत मेंटेनन्ससाठी बंद राहणार आहे.आता बँकेने केलेल्या नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे की कनेक्टिव्हिटी नसल्याने आमच्या कोअर बँकिंग सेवा सध्या कोणत्याही ग्राहकांना वापरता येणार नाहीत.


आता फक्त एटीएम सेवा सुरळीत सुरु राहणार आहेत. मात्र उर्वरित सेवा बंद असेल असे बँकेने आता तासाभरापूर्वी स्पष्ट आहे

 तसे तुम्हाला माहिती असेल भारतीय स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक आहे .म्हणजे या बँकेचा बाजारात 25 टक्के हिस्सा आहे. तसेच या बँकेच्या देशभरात 24 हजार शाखा आहेत तर संपूर्ण देशात जवळपास 42 कोटी ग्राहक आहेत. आता बँकेची ऑनलाइन बँकिंग सेवा बंद झाल्याने या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.


काही काही तासानंतर अजून एक ट्विट आला की त्यांची सेवा चालू झाली आहे .वाट बघितल्या बद्दल त्यांनी धन्यवाद सुद्धा व्यक्त केला .

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने