Translate

राज्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू


राज्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू होणार मुख्यमंत्र्याचा महत्वाचा निर्णय.अपल्या राज्याचा सर्वोच्च सन्मान ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार गेली पाच वर्षे कोणालाही प्रदान करण्यात आलेला नव्हता.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू होणार मुख्यमंत्र्याचा महत्वाचा निर्णय
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानचिन्ह


आता मात्र हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली आहे.

आपल्या  राज्यात 1995 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार  राज्य सरकारने सुरू केला होता.राज्यात पहिल्यांदा 1997 मध्ये पहिला हा पुरस्कार पु.ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला होता.


हा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या महान व्यक्तींना दिला जातो.आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान, समाजसेवा, इ दिला जातो.या पुरस्काराची रक्कम रु.10 लाख देऊन सन्मानित करण्यात येते व शोल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.


2012 मध्ये महाराष्ट्र भूषणच्या नियमा मध्ये बदल करण्यात करण्यात आले. यापुढे हा पुरस्कार इतर राज्य व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.


2015 मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार दिला होता त्यावर अनेक वादही झाले होते. त्यानंतर मात्र राज्य सरकारने हा पुरस्कार कोणालाही दिला नाही.आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पुरस्कार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


इ.स 1997 मधे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. ते एक मराठी लेखक, अभिनेता, कथाकार आणि पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार आणि गायक होते. त्यांना हा पुरस्कार साहीत्य क्षेत्रा मधे प्राप्त झाला.

इ.स 1998 मधे, लता मंगेशकर यांना हा पुरस्कार संगीत क्षेत्रा मधे देण्यात आला.लता मंगेशकर हे भारताचे सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका आहेत.

इ.स 1999 मधे, श्री. सुनील गावस्कर यांना हा पुरस्कार क्रिडा क्षेत्रात देण्यात आला. सुनील गावस्कर हा भारताचा माजी क्रिकेटपटू आहे. सुनील गावस्कर हे सध्याच्या युगातील क्रिकेटच्या महान फलंदाजांमध्ये म्हणून ओळखले जातात.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू होणार मुख्यमंत्र्याचा महत्वाचा निर्णय


दरम्यान आपल्या राज्यात हा  पुरस्कार आता पुन्हा सुरू होणार तसेच हे नॉलेज अपडेट महत्वाचे आहे.आपण इतरांना देखील शेअर करा 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने