Translate

करोना मधून जर तुम्ही बरे झाला असाल तर हे आजार तुम्हाला होऊ शकतात

करोना मधून जर तुम्ही बरे झाला असाल तर हे आजार तुम्हाला होऊ शकतात.


ही बातमी त्या लोकांसाठी आहे. जे करोना वायरस संक्रमणापासून बरे झाले आहे आणि त्यांना वाटतं की आता आम्हाला भविष्यामध्ये काहीही अडचण नाही.संशोधना मधे अस कळाला की जर तुम्हाला करुणा झाला आहे आणि आता तुम्ही बरेच झाला आहात तरीही तुम्हाला श्वास घेताण तकलीफ होऊ शकते, थकवा, चिता व डिप्रेशन सारखे लक्षणे दिसुण येतात 

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार, कोविड -19 च्या संसर्गातून बरे झाल्यानंतरही 10  पैकी  6 रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.


कोविड 19 च्या रुग्णामधील 60 टक्के रुग्णांचे फुफ्फुसे, 29 टक्के रुग्णांची किडनी, 26 टक्के रुग्णांचे  हार्ट तर 10 टक्के रुग्णांचे लिवर योग्यरित्या काम करत नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. बरे झाल्यानंतर बरेच महिने रुग्णांच्या अवयवामध्ये सूज आणि जळजळ होण्याची समस्या उद्भवली होती.थकवा येण्याची समस्या असलेल्या प्रत्येक 10 पैकी 5 रुग्णामधे  चिंता आणि नैराश्याची लक्षणे देखील होती.


यूकेच्या(यूनाइटेड किंगडम) रूग्णांमध्ये, कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनंतरही ही लक्षणे दिसू लागली. ब्रिटनमधील तज्ज्ञांनी दीर्घकाळ टिकणार्‍या कोरोना विषाणूच्या या लक्षणांना 'लाँग कोविड' असे नाव दिले आहे


हा अभ्यास ब्रिटनमधील रुग्णांवर करण्यात आला असून कोरोना विषाणूमुळे बरे झालेल्या 67 लाख लोकांसाठी हे खूप महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते, कोरोना विषाणूचा संसर्ग बरा होण्यासाठी 14 दिवस लागतात. संसर्ग बरा झाल्यावर आपणास रुग्णालयातून फ्री केले  जात. परंतु कोरोना विषाणूची काही लक्षणे निरोगी झाल्यानंतरही आपल्या शरीरात उपस्थित राहतील.


जर तुम्हाला असे लक्षणे दिसुण येत आसतील तर डॉक्टरशी संपर्क साधा,डॉक्टरांना यावर उपाय काय आहे हे विचारा.नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने शारीरिक व मानसिक शक्तीमध्ये वाढ केली जाऊ शकते,त्यामुळे व्यायाम करणे गरजेचे आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने