Translate

JEE परीक्षा आता मातृभाषेतून

खूशखबर ! इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असणारी  JEE परीक्षा आता मातृभाषेतून देता येणार  विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी.

JEE परीक्षा आता मातृभाषेतून देता येणार
JEE परीक्षा आता मातृभाषेतून


देशातल्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी  JEE Main ही प्रवेश परीक्षा. इथून पुढे प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा घेतली जाईल. अशी मोठी घोषणा आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे.


पोखरियाल यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं आहे.

दरम्यान काल रमेश पोखरिया यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून JEE परीक्षा बाबत मोठी घोषणा केली आहे.

त्यानुसार इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी JEE ही परीक्षा- यापुढे मातृभाषेतून सुद्धा देता येणार. अपल्या  राज्यात हि परीक्षा आता मराठीतुन सुद्धा देता येणार हि माहिती प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खुप महत्वाची आहे. आपण इतरांना देखील शेअर करा.


दरवर्षी आठ ते नऊ लाख विद्यार्थी जेईई-मेन परीक्षा देतात.त्यामधील एक लाख विद्यार्थी महाराष्ट्रातून जेईई मेन्स परीक्षा देतात तर उत्तर प्रदेश मधील 97000, आंध्र प्रदेश मधील 88000, तेलंगणाचे 72000,  गुजरातचे 41000,  कर्नाटक मधील 51000, राजस्थान मधील 52000, तमिळनाडू मधील 48000,दिल्ली मधील 34000 विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. हे आकडे निश्चित नाही दरवर्षी यांमध्ये बदल होत राहतो.


या मधील दोन ते तीन लाख विद्यार्थी जेईई-मेन ल क्वालिफाय करतात. जे विद्यार्थी जेईई-मेन क्वालिफाय करतात त्यांना त्याच्या रँक नुसार एनआयटी मध्ये प्रवेश दिला जातो व जेईई ऍडव्हान्स च्या पेपरसाठी पात्र ठरतात.

जे विद्यार्थी जेईई- ऍडव्हान्स पेपर मधे चांगले मार्क घेतात त्यांना त्यांच्या रंगानुसार आय आय टी मध्ये ऍडमिशन दिले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने