Translate

SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट
SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट14 व्यांदा घटवले व्याजदर -पहा कसा होणार फायदा SBI नं कर्जाच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे यामुळे अनेक ग्राहकांना फायदा होणार आहे .
बँकेने अल्प मुदतीच्या एमसीएलआर दर 0.05 टक्के ते 0.10 टक्क्यांनी कमी करणार आहे.
पहा याचा फायदा कसा होणार.
तुम्हाला माहिती असेल एमसीएलआर वाढल्यामुळे घेतलेलं कर्ज महाग होतं आहे त्यामुळे आता MCLR खाली आला आता  बँक कमी दराने कर्ज देऊ शकणार तसेच गृह कर्ज ते वाहन कर्जे घेणे स्वस्त होईल.तसेच हा लाभ आता नवीन ग्राहकांबरोबरच एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतलेल्या त्या ग्राहकांना देखील मिळणार आहे. दरम्यान सध्या SBI चे एमसीएलआर दर देशात सर्वात कमी असल्याचा बँकेचा दावा आहे. SBI चे नवीन MCLR दर हे 10 जुलैपासून लागू होणार आहेत ,SBI ची हि बातमी  ग्राहकांसाठी नक्की महत्वाची आहे.


घरगुती वीज बिलात २ टक्के सवलत मिळणार त्याचे परिपत्रक जारी झाली.

 घरगुती वीज ग्राहकांना बिलात प्रचलित १ टक्क्यांऐवजी २ टक्के सवलत मिळेल अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती, त्यानुसार आता यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
 पहा हि सवलत कोणाला मिळणार ? 
 या परिपत्रकानुसार ज्यांना एप्रिल, मे महिन्याचे वीजबिल सरासरी देण्यात आले आणि जून महिन्याचे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार आले अशा ग्राहकांनी त्यांचे संपूर्ण बिल मुदतीत भरले तर त्यांना जूनच्या वीजबिलाच्या रकमेच्या २ टक्के परतावा - जुलैच्या बिलातून मिळेल ,तसेच ज्या घरगुती ग्राहकांचे एप्रिल ,मे आणि जून या तीन महिन्याचे प्रत्येकी बिल सरासरी वापरानुसार दिले आहे .त्यांनी संपूर्ण बिल मुदतीत भरल्यास त्यांना - जुलैच्या चालू बिलाच्या रक्कम मध्ये २ टक्के सवलती दिली जाईल 

 मग वीजबिल हप्त्यांमध्ये कसे भरायचे ? 
ज्या ग्राहकांना जूनचे वीजबिल तीन हप्त्यांमध्ये भरायचे आहे, त्यांना ते जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर मध्ये चालू वीज बिला सोबत भरता येईल,वीजबिलाच्या संबंधतीत असलेली हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाची आहे प्रत्येकाने शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post