Translate

रशियामध्ये तयार झालेली लस कोरोना संपवणार का ? - प्रत्येकाने वाचा
रशियामध्ये तयार झालेल्या लसी बद्दल माहिती द्या अशी अनेक लॊकांची मागणी होती.कारण नकीच आपण अनेक दिवसापासून कोरोना या शब्दालाच वैतागलो आहे.आज आपण हि लस आणि यावितरिक्त तयार होत असलेल्या आणखी लसी विषयी माहिती घेऊ 


 आपण हे आणखी सविस्तर समजून घेऊ
तुम्हला माहिती नसेल पण जगभरात सध्या कोरोनासाठी १५० पेक्षा जास्त लसी तयार करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये आपल्या भारतात विकसित झालेल्या दोन लसींचा देखील समावेश होणार आहे.दरम्यान आता रशियामधील लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असली तरी ती फक्त फेज वनची चाचणी होती आणि ही माहिती बहुतांश बातम्यांमध्ये देण्यात आली नव्हती आता १३ जुलैपासून या लसीच्या फेज दोनची ट्रायल सुरु झाली आहे,जगभरात अशा अनेक लसी आहेत ज्या फेज १, २ मध्ये सुरक्षित ठरल्या आहेत. दरम्यान यानंतर जर हि लस फेज ३ मध्ये जर यशस्वी ठरली तर WHO चे अधिकारी लस परत चेक करतील. आणि नक्कीच या १५० लस पैकी कोणती लस यशस्वी होणार हे आपण नाही सांगू शकत, त्यामुळे अजून काही दिवस थोडी काळजी घ्या ,आपली व आपल्या परिवाराची.


लॉकडाऊन दरम्यान आलेल्या भरमसाट बिलांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र वीज बिलांबाबत निकाल देण्यास हायकोर्टाने नकार दिला ,तसेच यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाकडेच दाद मागण्याचे सांगितले.

राज्यात काल  ६ हजार ७१४  नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ६७ हजार  पेक्षा जास्त  झाली आहे - तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 9 लाख 6 हजार पेक्षा जास्त झाली आहे.‘कोविड सुरक्षा कवच’ योजना लागू करण्याचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे.२०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीतील ज्या करदात्यांनी आपल्या प्राप्तिकर विवरणपत्रांची पडताळणी पूर्ण केलेली नसेल,त्यांच्यासाठी सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत वन टाइम असून, यानंतर पुन्हा मुदत मिळणार नाही..सीबीएसई  १०वी च्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी १५ जुलै रोजी जाहीर झाला - www.cbseresults.nic.in

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत पुन्हा वाढ झाली, ते आता जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झालेत.
वैद्यकीय परीक्षार्थ्यांसाठी सुरक्षेच्या द्रुष्टीकोनातून पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना.
दक्षिण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील ३६ तास चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे , याकाळात मराठवाड्याच्या काही भागात पाऊसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने लॉकडाऊनदरम्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही वजावट करू नये, असे दिले होते - मात्र ज्यांना लॉकडाऊनच्या आधीपासूनच वेतन मिळत नाहीत अशा कर्मचाºयांसाठी हा आदेश लागू होणार नाही -  असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. Post a Comment

Previous Post Next Post