Translate

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकले

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.  


काही दिवसांपासून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या बाबत राज्यातील सर्वच विद्यार्थी व पालक यांच्या समोर चिंताजनक प्रश्न उभा होता. संपूर्ण राज्यातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून असलेल्या निर्णय आज घेण्यात आला. आज घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.ट्रेडिंग म्हणजे काय? आपल्या मराठी भाषेत 


राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. 


सदरील बैठकीत परीक्षा ऑनलाइन घ्यायची ऑफलाइन याविषयी चर्चा झाली परंतु सध्याची परिस्थिती पाहता ऑफलाईन परीक्षा ही संसर्गात कारणीभूत ठरू शकते तसेच ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम मुळे ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. सर्वच बाबी लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने