भारतात क्रिकेट हा धर्म का आहे?
स्टीव्ह वॉने काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्श ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून स्टीव्ह वॉ यांना भारतीय क्रिकेटने वेडा केला आहे.भारतात क्रिकेट हा धर्म का आहे?, हे समजून घेण्यासाठी वॉने यांनी क्रिकेटच्यानिमित्ताने भारतातील विविध राज्यांना भेटी देताना तेथील क्रिकेटप्रेम कॅमेऱ्यात साठवून घेतले. त्याच्या या छायाचित्रांचे प्रदर्शन नोव्हेंबरच्या अखेरीस सिडनीतभरणार आहे.
स्टीव्ह वॉने |
द स्पीरिट ऑफ क्रिकेट इंडिया
त्याच्या या भारतभेटीवरील पुस्तकात ही सगळी छायाचित्रे समाविष्ट आहेत.भारताच्या या क्रिकेट प्रवासात त्याने हा खेळ जीवनाचा एक भाग असल्याचा अनुभव घेतला. 'द स्पीरिट ऑफ क्रिकेट इंडिया' या स्टीव्ह यांच्या पुस्तकात भारतभेटीची २०० छायाचित्रे समाविष्ट आहेत. त्यांच्या ७० छायाचित्रांचे प्रदर्शन सिडनीत नोव्हेंबरच्या अखेरीस भरणार आहे. स्टीव्ह म्हणतात, 'भारताने मला जीवनभर साथ देतील, अशा आठवणी दिल्या आहेत.
किंबहुना, त्यामुळे माझेजीवनच बदलून गेले आहे, असेही म्हणता येईल. क्रिकेट हा भारतात धर्म का आहे, याचा शोध घेणे हाच या पुस्तकामागील उद्देश आहे.' स्टीव्ह वॉ यांनी हाती कॅमेरा घेत मुंबई, जोधपूर, कोलकाता, राजस्थान ते हिमालयातील पायथ्यापर्यंत विविध भागात फिरून हे क्रिकेटवेड टिपले आहे.त्याच्या या भारतभेटीचा छोटा माहितीपट १७ नोव्हेंबरला प्रसारित होणार आहे.
Post a Comment