एसटी महामंडळाचा मोठा निर्णय राज्यात आता नव्या ओटीसी कार्डची सुरवात.
ST Mahamandal Bus |
एसटी कडून बसमध्ये पैशांची देवाण घेवाण कॅशलेस होण्यासाठी पर्यंत सुरु आहेत. त्यासाठी सध्या विविध सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्टकार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान या कार्डबरोबर राज्यात आता ओटीसी’ कार्ड ची देखील सुरवात होत आहे.पाहिले तर सध्या मिळत असलेले स्मार्टकार्ड संबंधित प्रवाशांच्या आधार कार्ड व मोबाईलशी लिंक केलेले असते. एसटी महामंडळाने आता कोणत्याही ओळखपत्राची गरज नसलेले ‘ओटीसी’ कार्ड म्हणजेच 'ओव्हर द काऊंटर कार्ड' सुरु केले आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे या कार्डचा वापर कोणीही करू शकणार दरम्यान इतर कार्ड प्रमाणे या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून मिळेल.तसेच एजंटला प्रवाशाचे नाव व मोबाईल क्रमांक सांगितल्यानंतर लगेच हे कार्ड मिळू शकेल रिचार्ज केलेले कार्ड बसमध्ये वाहकाकडे द्यावे लागेल वाहक आपल्याकडी ‘ईटीआयएम’ मशीनवर हे कार्ड लावेल त्यानंतर वाहक मशीनमधील माहितीनुसार तुमचा थांबा निवडेल त्यानुसार तुमच्या कार्ड वरून पैसे कट होतील तसेच या नव्या कार्ड साठी प्रवाशाला कोणतेही ओळकपत्र दाखवावे लागणार नाही.असे राज्याच्या एसटी महामंडळाने स्पस्ट केले आहे.
दरम्यान एसटी महामंडळाने राज्यात आता नव्या कार्डची सुरवात केली आहे. हि माहिती आपल्यासाठी खूप महतवाची आहे.
Post a Comment