जन धन मध्ये खाते उघडा आणि 5 हजार यांचा ओव्हरड्राफ्ट मिळवा
जन धन मध्ये खाते उघडा आणि 5 हजार यांचा ओव्हरड्राफ्ट मिळवा पहा कशी आहे केंद्र सरकारची योजना. प्रधानमंत्री जन धन योजनेची माहिती आपण अगोदर पण घेतली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तसेच पोस्ट ऑफिस मध्ये झिरो बॅलन्सवर बँक खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत आता ग्राहक त्यांच्या खात्यात बॅलेन्स नसेल तरी ते 5 हजार रुपये काढू शकतील.
जन धन योजना |
प्रधानमंत्री जन धन योजनेच्या खातेदाराला 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते - मात्र यासाठी तुमचे आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.
तुम्हाला ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय तुम्हाला समजले असेलच - तसे आगस्ट महिन्यात आपण ओव्हरड्राफ्ट बद्दल खूप सारी माहिती घेतली होती. ओव्हरड्राफ्ट ही सुविधा बँकेची सुविधा आहे ज्या अंतर्गत खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसतानाही पैसे काढू शकतो. याचा अर्ध खातेदारांच्या खात्यात शून्य रक्कम आहे. याठिकाणी जर कोणतेही पंतप्रधान जनधन खाते जर आधार कार्डशी जोडलेले नसेल तर त्याला मात्र ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळणार नाही. तशी जन धन योजना खूप मोठी योजना आहे या योजनेंतर्गत आपण 10 वर्षाखालील मुलाचे देखील खाते उघडू शकता. अधिक माहिती साठी जवळच्या राष्ट्रीयीकृ बँकेला भेट द्या.
प्रधानमंत्री जन धन योजना ही भारत सरकारची आर्थिक योजना आहे जी बँक खाती, पैसे, विमा आणि निवृत्तीवेतन यासारख्या वित्तीय सेवांमध्ये परवडणारी प्रवेश विस्तारित करते.जन धन योजना ही 2014 मधे चालू करण्यात आली होती.या योजने ची सुरवात मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता.दरम्यान जन धन योजनेची हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच महत्वाची आहे.आपण थोडस सहकार्य इतरांना पण शेअर करा
Post a Comment