Translate

 इंजिनीअरिंगची पहिली मेरिट लिस्ट जाहीर

इंजिनीअरिंगची पहिली मेरिट लिस्ट जाहीर, आता पुडे काय? वाचा

तसेच पहा इतर परीक्षांचे अपडेट. राज्यभरातून अभियांत्रिकीसाठी 1 लाख 18 हजार 390 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली. दरम्यान याची प्राथमिक गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर झाली तर 6 जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन 7 जानेवारीपासून पहिली प्रवेश फेरी सुरू होणार आहे. दरम्यान फार्मसीच्या प्रवेशासाठीही हेच वेळापत्रक लागू असेल. 

पहा अभ्यासक्रमाचे वेळापत्रक ?

एमबीए ची 7 जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल , तर 8 जानेवारीपासून पहिली प्रवेश फेरी सुरू होणार आहे. तसेच एमटेक, एम फार्मसी, एम आर्च, एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी 1 जानेवारी रोजी जाहीर झाली. 


तर आज रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी शेवटची मुदत असेल.  यानंतर एमसीएची अंतिम गुणवत्ता यादी 4 जानेवारी - तर एमटेक, एम फार्मसी, एमआर्च या अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी 5 जानेवारी रोजी जाहीर होईल.


तर 6 ते 8 जानेवारी  दरम्यान पहिली प्रवेश फेरी होईल. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.


Post a Comment

Previous Post Next Post